‘स्वर्णिम विजय वर्ष’ निमित्ताने राष्ट्रीय युद्ध स्मारक येथुन निघालेल्या विजय मशालीचे नगरमध्ये आगमन.

           १९७१ च्या युद्धातील भारतीय लष्कराच्या विजयाचे स्मरण करीत ३ डिसेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२१ हे वर्ष ‘स्वर्णिम विजय वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. याकाळात राष्ट्रीय युद्ध स्मारक येथील अमर ज्योती पासून चार विजय मशाल प्रज्ज्वलित करून त्या देशातील वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आल्या आहेत. त्यामधील एका ‘स्वर्णिम विजय मशाल’ चा आज नगरमध्ये प्रवेश झाला.
           ही मशाल घोडस्वार, सायकलस्वार व धावपट्टू यांनी आर्मड कोअर सेंटर अँड स्कूल मार्गे एमआयआरसी येथील युद्ध स्मारक येथे आणली. त्याठिकाणी १९७१ च्या युद्धामध्ये सहभागी झालेले ब्रिगेडियर आर.एस.रावत (वीएसएएम, सेवानिवृत्त) त्यांच्याकडे ही मशाल देण्यात आली. त्यानंतर ही मशाल युद्ध स्मारक येथे ठेवण्यात आली, व तेथे एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही.एस.राणा (वीएसएम) यांनी तसेच १९७१ च्या युद्धामध्ये सहभागी झालेल्या जवानांनी युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय एमआयआरसी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या बांगलादेश येथील सैन्य अधिकाऱ्यांनी देखील युद्ध स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण केली. आता ही मशाल युद्ध स्मारक येथे ४ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. तसेच यानिमित्त एमआयआरसी येथे विविध उपक्रम होणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने