आदर्श गावच्या उमेदवारांनाच वाटत आहे जीवाची भीती.

          हिवरेबाजार महाराष्ट्रतील आदर्शगाव, यामुळेच या गावचे नाव देश विदेशात पोहचले आहे. पण सध्या ग्रामपंचायत निवडणुकी मुळे हे गाव परत चर्चेत आले आहे. हिरवेबाजार मध्ये तीस वर्षापासून बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या वर्षी दोन पॅनल मध्ये लढल्या जाणार आहेत.यातील परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनाच आपल्या या आदर्श गावातच जीवाची भीती वाटत असुन, तसे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
          या निवेदनात म्हटले आहे.'आम्ही स्वतंत्र पॅनल उभा केला म्हणून आम्हाला फारमोठया प्रमाणात राजकीय विरोध सुरु झाला आहे. त्यातुनच आम्हास धमकावले जात आहे. तसेच आमच्या प्रचारामध्ये अडथळा निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. तसेच गावामध्ये निवडणूकीच्या दरम्यान राजकीय वाद उपस्थित करुन वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे.'
          तसेच 'आमच्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक सनदशीर मार्गाने पार पडण्यासाठी व आमच्या जीवाला राजकीय विरोधक यांच्याकडून धोका निर्माण झाला असल्याने सदर निवडणूकीच्या कार्यक्रमामध्ये व निवडणूक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच निवडणूक होईपर्यंत पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक व गरजेचे आहे,'अशी मागणी निवेदनात केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने