Ambani प्रकरणात NIA मार्फत चौकशी व्हावी फडणवीस यांची मागणी.

          मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे. अंबानी यांच्या घराजवळ ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्या होत्या, ती कार ठाण्यातील मनसुख हिरेन या व्यक्तीशी संबधित असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते.
           दरम्यान, आज अचानक मुंब्रा खाडीत मनसुख यांचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. यावरून विधानसभेत आवाज उठवत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मनसुख हिरेन यांची ही गाडी विक्रोळी येथे बंद पडली होती. त्यानंतर तिथून ओलाने ते क्रॉफर्ड मार्केटला आले होते. तिथे ते एका व्यक्तीला भेटले ती व्यक्ती कोण होती? ही गाडी अंबानी यांच्या घराजवळ सापडली तेव्हा तिथे स्थानिक पोलिसांच्या आधीही सचिन वाझे कसे पोहचले?,धमकीची चिठ्ठी त्यांनाच कशी मिळाली?, असे प्रश्न उपस्थित करताना मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात ८ जून २०२० पासून अनेकदा फोनवर संभाषण झाल्याचे दिसत आहे.
           असे विविध प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले, हा सारा घटनाक्रमक संशयास्पद असून याप्रकरणी एनआयए मार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने