नगर येथील रेखा जरे (Rekha Jare) खून प्रकरणातील सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याला फरार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला. बाळ बोठे याला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर संपत्ती जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे (Rekha Jare Murder Case)
नगर पोलिसांनी बाळ बोठे याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर गुरूवारी सुनावणी झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी हा अर्ज मंजूर केला. त्यामुळे आता आरोपी बोठे याला कायदेशीररित्या फरार घोषित करण्यात आले आहे.
बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच फेटाळला आहे. आता पोलिसांकडून आरोपीला फरार घोषित करण्याचा अर्ज मंजूर केल्याने आता पोलिसांना पुढील कायदेशीर कारवाईचे मार्ग मोकळे झाले आहेत यामुळे बोठे याची आणखी कोंडी झाली आहे. |
टिप्पणी पोस्ट करा