बाळ बोठे (Bal Bothe) याला अखेर अटक .

           नगर येथील रेखा जरे (Rekha Jare) खून प्रकरणातील सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे (Bal Bothe held in Hydrabad). अहमदनगर पोलिसांनी, हैदराबाद पोलिसांच्या मदतीने आज शनिवारी पहाटे त्याला हैदराबादमधून ताब्यात घेतले. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता. याआधी बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला होता (Rekha Jare Murder Case)

           या बाबत माहिती देताना अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितले कि, अहमदनगर जिल्यातील सहा पथक बाळ बोठे याचा शोध घेत होते त्यासंबंधी ते हैदराबाद मध्ये तळ ठोकून होते. या आधी हैदराबाद येथे ही 3 वेळा आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता, परंतु आज सकाळी 6 वाजता हैदराबाद येथील एका हॉटेल मध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी हॉटेल मधील ज्या रूम मध्ये लपून बसला होता त्याला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते अशी माहिती ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने