गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री हरदीपसिंग पुरी, यांनी राहणीमान सुलभता निर्देशांक (Ease of Living Index (EoLI) 2020) आणि स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक (म्युनिसिपल परफॉरमेन्स इंडेक्स, MPI 2020) अंतिम मानांकनांची घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमात केली. मंत्रालयाचे सचिव श्री दुर्गा शंकर मिश्रा व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे आणि दहा लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसाठीही राहणीमान सुलभता निर्देशांक 2020 अंतर्गत मानांकनाची घोषणा करण्यात आली. यासाठी 2020 मध्ये मूल्यांकन सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात १११ शहरांनी भाग घेतला. त्यांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. "दशलक्ष +" म्हणजेच दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असणारी शहरे आणि दहा लाखाहून कमी लोकसंख्या असणारी शहरे. यात स्मार्ट सिटीज कार्यक्रमाअंतर्गत सर्व शहरांचा समावेश करण्यात आला.
"दशलक्ष +" गटात बंगळुरू प्रथम क्रमांकावर, त्यानंतर पुणे (Pune), अहमदाबाद, चेन्नई, सूरत, नवी मुंबई, कोयंबतूर, वडोदरा, इंदूर आणि बृहन्मुंबई यांचा क्रमांक लागतो. दशलक्षाहून कमी गटात, राहणीमान सुलभता निर्देशांकात सिमला शहर सर्वोच्च स्थानावर असून त्यानंतर भुवनेश्वर, सिल्वासा, काकीनाडा, सालेम, वेल्लोर, गांधीनगर, गुरुग्राम, दावणगिरी आणि तिरुचिराप्पल्ली यांचा क्रमांक आहे .
ईओएलआय, ही एक अशी मूल्यांकन प्रणाली आहे जी राहणीमानाचा दर्जा आणि शहरी विकासासाठी विविध उपक्रमांच्या परिणामाचे मूल्यांकन करते. नागरिकांची जीवनशैली, शहराची आर्थिक क्षमता, तिचा टिकाऊपणा आणि लवचिकता यावर आधारित भारतभरातील भाग घेणार्या शहरांची विस्तृत माहिती ही प्रणाली प्रदान करते. याबाबत नागरीकांचे मत काय आहे? दृष्टिकोण काय आहे? याचाही समावेश मूल्यांकनात केला आहे.
राहणीमान सुलभता निर्देशांकाच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक (एमपीपी) सुरू करण्यात आला. सेवा, वित्त, धोरण, तंत्रज्ञान आणि कारभाराच्या पार्श्वभूमीवर पालिकांमध्ये स्थानिक सरकारची कामगिरी कशी आहे याचे मोजमाप करण्याचा हा प्रयत्न आहे.
ईओएलआय 2020 निर्देशांकाच्या सर्वेक्षणातत नागरीकांच्या दृष्टिकोनाला, मताला 30 % मुल्य ठेवण्यात आला असून यामुळे या प्रणालीची चौकट अधिकच भक्कम झाली आहे. त्याची व्याप्ती वाढली आहे. जीवनशैली, आर्थिक क्षमता, शाश्वतता अशा 13 श्रेणींमध्ये याचे परिक्षण करण्यात आले आहे.पालिका क्षेत्रात नागरिकांना कशी सेवा मिळतेय याचे सर्वेक्षण करताना थेट नागरीकांकडूनच जाणून घेण्यात आले. त्यासाठी नागरीकांचा दृष्टिकोन सर्वेक्षण, सीपीएस घेण्यात आले. मूल्यांकनाला 16 जानेवारी 2020 पासून सुरुवात झाली आणि ते 20 मार्च 2020 पर्यंत ते करण्यात आले. 111 शहरांमधील एकूण 32 लाख 20 हजार नागरिक सर्वेक्षणात सहभागी झाले होते.
सर्वेक्षणाचा सर्वांगीण विचार करता महाराष्ट्रात पुणे (pune) हे राहण्यासाठी Best city आहे, तर भारतातील शहरांची दोन्ही निर्देशांकांमधील क्रमवारी https://eol.smartcities.gov.in वर ऑनलाइन पाहु शकता.
|
टिप्पणी पोस्ट करा