आजचे मुख्यमंत्र्यांचे हे भाषण सभागृहातलं भाषण नसून चौकातलं भाषण होते - देवेंद्र फडणवीस

          आजचे मा.मुख्यमंत्र्याचे(Maharashtra CM) भाषण सभागृहातलं भाषण नसून चौकातलं भाषण आहे, अशी टीका माझी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते मा.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली ते माध्यमांशी बोलत होते. आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली, त्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) यांनी सभागृहात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर हल्लाबोल चढवला. या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्द्यांवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला,असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
           दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे या मुद्द्यांवर लक्ष वेधताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मर्गात खिळे आणि चीन दिसला पळे ही भूमिका बदलून सीमेवर खिळे ठोकले असते तर चीन देशात घुसला नसता, असं विधान केलं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले 'मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा देखील अपमान केला आहे. चीन समोर आला की पळे, असं जे मुख्यमंत्री म्हणाले, हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे. ज्या सैनिकांनी उणे ३० डिग्री तापमानात चीनसोबत लढाई करून, भारताची एक इंच भूमी चीनला मिळू दिली नाही आणि चिनी सैनिकांना मागे जावं लागलं. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एक इंच भूमी देखील चीनला मिळाली नाही, त्या शूर सैनिकांचा जणू काही ते पळपूटे आहेत, असा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे'.
           ते पुढे म्हणाले 'मुख्यमंत्री कदाचित पूर्ण तासभर बोलले, पण या तासभरात ते महाराष्ट्रात येऊच शकले नाही. ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, अमेरिका, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीरसह दक्षिणेतही गेले. पण महाराष्ट्राबद्दल मात्र त्या संपूर्ण तासभरात एक वाक्य देखील ते बोलू शकले नाहीत,' अशी टीकाही त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने