वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod resignation) यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर.

          विरोधी नेत्यांनी पूजा प्रकरणात आरोप केलेले आणि गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मा.मुख्यमंत्र्यांना विधानपरिषद अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सोपवला होता.
           मुख्यमंत्र्यांकडून दि. ४ मार्च रोजी दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला (Maharashtra Governor accepts minister Sanjay Rathod's resignation) असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने