छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची बिस्किटे जप्त.

          छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 03.03.2021 रोजी एतिहाद विमान क्र. ई वाय -206 या विमानाची झडती घेतली होती व ४ मार्च २०२१ रोजी कोणाचाही दावा नसलेली सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.
           जप्त केलेल्या वस्तूंमध्ये, 24,57,792 रुपये मूल्याची दावा नसलेली प्रत्येकी 582 ग्राम वजनाची २४ कॅरेट सोन्याची दहा तोळ्याची पाच बिस्किटे आणि अंदाजित एकूण वजन 2554 ग्राम असलेले आणि 2350 ग्राम निव्वळ वजनाचे अंदाजित 99,24,073 रुपये किंमतीचे असे एकूण अंदाजित 1,23,81,865 रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. शौचालयात आरशाच्या मागे असलेल्या पत्र्यामागे हे सोने लपविण्यात आले होते .
           सीमाशुल्क न भरता भारतात तस्करी करत सीमाशुल्क कायदा, 1962 चे उल्लंघन केल्याची खात्री पटल्यानंतर, 04.03.2021 रोजी पंचनामा करून हे सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्ध पत्रकात दिली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने