जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचं वृत्त समोर आल्यानंतर, या प्रकरणात एका पोलिस अधिकाऱ्यांनी याचा व्हिडिओ काढल्याचाही आरोप केला जात होता. मात्र, या संदर्भात गृहमंत्र्यांनी आता स्पष्टीकरण देत निवेदन सादर केले. गुरुवारी सभागृहात महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला वसतीगृहात एकूण १७ महिला आहेत. या महिलांनी वसतीगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथं भेट देऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांसोबत चर्चा केली. महिलांचं वसतीगृह असल्यानं एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये गेल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांन दिला असून तो मी पटलावर ठेवतो, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होते. |
टिप्पणी पोस्ट करा