कोविडची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक येणार.

          महाराष्ट्र व पंजाब या राज्यांद्वारे दररोज नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद सातत्याने होत असल्याचे लक्षात घेता, केंद्र सरकारने उच्चस्तरीय बहु-शिस्त सार्वजनिक आरोग्य पथके (high level multi-disciplinary public health teams) या राज्यात पाठवली आहेत. ही पथके राज्य आरोग्य विभागांना परीस्थितीवर लक्ष, नियंत्रण व नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी सहाय्य करणार आहेत.
           आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे वरिष्ठ अधिकारी सीएमओ डॉ. पी. रविंद्रन (Sr.CMO, Disaster Management Cell) हे महाराष्ट्रातील उच्चस्तरीय संघाचे नेतृत्व करतील. तर पंजाबमधील पथकाचे नेतृत्व नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (NCDC), नवी दिल्लीचे संचालक डॉ.एस.के.सिंह करणार आहेत.
           ही पथके त्वरित राज्यांना भेट देणार असून राज्यातल्या कोविड हॉटस्पॉटची पाहणी करणार आहेत. तसेच कोविड संक्रमण वाढण्यामागची कारणे ते शोधून काढतील. त्यानंतर आपल्या निरीक्षणांविषयी ते मुख्य सचिव/आरोग्य सचिवांशी चर्चा करतील तसेच त्यावर राज्यातील आरोग्य विभागांनी काय उपाययोजना करायला हव्यात, याचाही सल्ला देतील.
           केंद्र सरकारने, कोविड महामारीविरुद्ध लढा देतांना “संपूर्ण सरकार’ आणि ‘संपूर्ण समाज’असा व्यापक दृष्टीकोन ठेवला असून सहकार्यात्मक संघराज्य तत्वानुसार, या संकटाचा मुकाबला करत आहे. कोविड व्यवस्थापनात विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रयत्न अधिक बळकट करण्यासाठी, केंद्र सरकारने वेळोवेळी केंद्राची पथके विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशात पाठवली आहेत. ही पथके राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कोविडच्या आव्हानाची नेमकी आणी प्रत्यक्ष माहिती घेतात. जेणेकरुन त्याचा सामना करतांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जाऊ शकतील. या केंद्रीय पथकांचे अहवाल राज्यांनाही पाठवले जातात, ज्याच्या आधारावर राज्ये आपली पुढची उपाययोजना करु शकतील. राज्यांनी केलेल्या उपाययोजनांवर केंद्रीय आरोग्य विभाग देखरेख ठेवत असतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने