वाहनांच्या पुढील जागांवरील प्रवाश्यांसाठी एअरबॅग अनिवार्य.

           वाहनांच्या पुढील जागांवरील प्रवाश्यांसाठी सरकारने एअरबॅग अनिवार्य केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की एअरबॅगच्या अनिवार्य करण्याच्या तरतूदीबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. जेव्हा मोटार वाहनांमध्ये अपघात होतात तेव्हा सर्वात मोठा धोका हा समोरच्या जागांवर बसलेल्या लोकांना असतो. मोटार वाहनांना समोरासमोर धडक बसल्यास समोरच्या जागांवर बसलेले प्रवाशी प्राण गमावतात.आता यावर उपाय म्हणून सरकारने मोटार वाहनांमध्ये पुढच्या सीटवर एअरबॅग बंधनकारक केले आहेत. ही तरतूद 1 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यानंतर तयार झालेल्या वाहनांना लागू होईल.
           मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'वाहनांमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या प्रवाश्यांसाठी एअरबॅग अनिवार्य करण्यात आली आहे. हा एक महत्वाचा सुरक्षा उपाय आहे. रस्ता सुरक्षाविषयक सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने त्याबाबत सूचना केली होती.'
           मंत्रालयाने म्हटले आहे की 1 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यानंतर तयार केलेल्या वाहनांमध्ये पुढील सीटसाठी एअरबॅग आवश्यक असतील. जुन्या वाहनांच्या संदर्भात, 31 ऑगस्ट 2021 पासून, विद्यमान मॉडेल्ससाठी समोरच्या ड्रायव्हर सीटसह एअरबॅग ठेवणे अनिवार्य असेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने