मराठी भाषा भिकारी आहे का ? केंद्राचा हा करंटेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही : CM Uddhav Thackeray

          आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली, त्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) यांनी सभागृहात भाषण केले. यात चर्चे दरम्यान विरोधकांनी केलेले हल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांनी तेवद्याच ताकदीने परतवून लावले. यात चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा दिसला.
           मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकारने केलेल्या विविध कामांचा तसेच संकल्पांचा उल्लेख करत एकेका विषय उलगडला. राज्यपालांना धन्यवाद देतानाच राज्यपालांच्या अभिभाषणावर अविश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी विरोधकांना फटकारले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नसल्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. खोटे बोलून लाट येते, सत्ता येते पण ती टिकवणे कठीण असते, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेद्र मोदी (Narendra Modi) यांना लगावला.
           ते म्हणाले 'मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा गौरव दिन होता. आपण नेहमी म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ पण अजूनही केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभे केले गेले आहे. मराठी भाषा भिकारी आहे का, ही छत्रपतींची भाषा. ती भाषा भिकारी कशी असू शकते. छत्रपती नसते तर दिल्लीत जे बसले ते तरी असते का? केंद्राचा हा करंटेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, मराठी माती, मराठी माता हे विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर टीका केली.
           मा.उद्धव ठाकरेंनी म्हणाले माझ्याकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. आमच्या सगळ्या कामांना कायद्याचा आधार आहे'.'राज्यपाल महोदयांचे भाषण आपण सर्वांनी ऐकलं. राज्यपालांना मी धन्यवाद देतो. त्यांनी नि:पक्षपातीपणे सरकारची कामगिरी सर्वांसमोर ठेवली. त्यातही ते मराठीत बोलले याचा जास्त अभिमान वाटतो. त्यांनी मांडलेल्या मुद्दांवर अनेकांनी आक्षेप घेतला. राज्यपालांनी भाषण मान्य केले पण त्यांच्याच सदस्यांना ते मान्य नाही. राज्यपाल ही आपण संस्था मानता आणि त्या संस्थेवरच आपण अविश्वास व्यक्त केला आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधी नेत्यांवर टीका केली.
           मुख्यमंत्र्यांनी भाजपला हिंदुत्वावरून चांगलंच फटकारलं याबाबत बोलताना ते म्हणाले 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण तुम्ही ठेवलीत त्यासाठी मी आभारच मानेन पण तुम्हाला आताच बाळासाहेबांचे उमाळे का येत आहेत, हा प्रश्न मला पडला आहे. बाळासाहेबांच्या खोलीत जेव्हा अमित शहा आणि माझी चर्चा झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसांना दाराबाहेर ठेवलं होतं. आतमध्ये आम्ही फक्त दोघेच होतो. या बंद दाराआड झालेली चर्चा तुम्ही निर्लज्जपणे बाहेर येऊन नाकारताच कसे? मी मुद्दाम याला निर्लज्जपणा म्हणेन. असंसदीय शब्द असला तरी मी तो बोलेन. बंद खोलीत चर्चा झाल्यावर बाहेर येऊन खोटं बोलायचं हेच तुमचे हिंदुत्व आहे का? हेच तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम आहे का? २०१४ ला युती तुम्ही तोडली तेव्हाही आम्ही हिंदू होतो, आजही आहोत, उद्याही राहू, असे खडेबोलही उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.'
           बाबरी पाडल्यानंतर येरेगबाळे पळून गेले. पण जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे फक्त शिवसेनाप्रमुख म्हणाले होते याची आठवण पण उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना करून दिली. राम मंदिरा (ShreeRam Temple) बाबत बोलतान मुख्यमंत्री म्हणाले 'राम मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे होत आहे,आणि आता राम मंदिरासाठी हे घरोघर पैसे मागत फिरत आहेत. त्यांना ते आमच्यामुळे होते आहे, असे दाखवायचे आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने