COVID19 Vaccination-Day 50, देशभरात आतापर्यंत 2.06 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

          देशभरात आतापर्यंत कोविड-19 लसीची मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या आज (6.03.2020) पर्यंत 2.06 कोटी इतकी झाली. देशभरात कोविड लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021पासून सुरु झाली आणि पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे लसीकरण 2 फेब्रुवारी 2021 पासून सुरु झाले. कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्च 2021 पासून सुरु झाला, या टप्प्यात 60 वर्षे वयावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षे वयावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लास दिली जात आहे.
           संध्याकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 2,06,62,073 लोकांना लसीची मात्रा देण्यात आली.यात 69,72,859 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर 35,22,671 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे. 65,02,869 कोरोनायोध्यांनी पहिली तर 1,97,853 कोरोनायोध्यांनी दुसरी मात्राही घेतली आहे. 60 वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्या 30,05,039 ज्येष्ठ नागरिकांनी आणि सहव्याधी असलेल्या 45 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे.
           देशव्यापी लसीकरणाच्या आजच्या 15 व्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत एकूण 11,64,422 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी 9,44,919 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 2,19,503 आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच कोरोना योध्यांना दुसरी मात्रा देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने