वाचा IT च्या छापेमारी नंतर काय आहे Taapsee Pannu चे मत.

          Income Tax विभागाने अभिनेत्री तापसी पन्नू (taapsee pannu) हिच्या घरावर छापा टाकल्या नंतर यासंदर्भात तिची सतत चौकशी सुरु आहे. ६५० कोटींच्या कर अनियमिततेत अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांचा सहभाग आहे असा यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात आयकर विभागाने मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद येथे शोधमोहीम राबविली. शुक्रवारी रात्री पुण्यात तापासी आणि अनुराग यांची अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे.
           या प्रकरणावर पहिल्यांदाच अभिनेत्री तापसी पन्नू ने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. @taapsee ने सलग 3 ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीट मध्ये तिने लिहिले की,'मुख्यत 3 गोष्टींचा 3 दिवस सखोल तपास करण्यात आला. पहिला पॅरिसमध्ये असलेल्या तथाकथित बंगल्याची किल्ली. कारण मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे जाते.'


           आपल्या दुसर्‍या ट्वीटमध्ये, तापसीने छापेमारीतील दुसऱ्या मुद्द्यावर भाष्य केलं. तिने लिहिले की 'कथित पाच कोटींची कथित पावती जी भविष्यासाठी आहे.'


           आपल्या तिसर्‍या ट्वीटमध्ये तापसीने लिहिले की, सन्माननीय अर्थमंत्र्यांनुसार, २०१३ मध्ये माझ्या इथे छापा पडला होता. यापुढे मी स्वस्तातली कॉपी राहिली नाही.'
कंगनाने तिला अनेकदा स्वस्तातली कॉपी म्हणून संबोधले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने