केंद्रीय निवडणूक आयोगाने 26 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. परंतु सर्वाधिक नजर लागली आहे ती पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकडे.
शिवसेनेचा पश्चिम बंगाल निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून, ममताजींना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. ममता बॅनर्जी याच खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत, ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय होवो अशी आमची इच्छा आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Rout) यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.(Shivsena Backs TMC in Bengal)
|
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'शिवसेना पश्चिम बंगाल निवडणूक लढवणार की नाही याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. पक्षाचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सर्व असा सामना रंगलेला दिसत आहे. सर्व एम - मनी, मसल अॅण्ड मीडिया (पैसा, ताकद आणि मीडिया) चा वापर ममता दीदींविरोधात वापरलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय होवो, कारण आम्हाला वाटतं की त्याच खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत' |
टिप्पणी पोस्ट करा