रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकिटांच्या (platform ticket) किंमतीतील वाढ ही तात्पुरती

          रेल्वे स्थानकांवर केलेली प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीतील वाढ ही तात्पुरती आहे आणि ही वाढ प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेला एक उपाय आहे. जास्त लोकांना प्लॅटफॉर्मवर येण्यास परावृत्त करण्यासाठी परिस्थितीचे आकलन करून प्लॅटफाॅर्म तिकिटांच्या किंमतीत वेळोवेळी वाढ करण्यात येते. ही पध्दत अनेक वर्षांपासून रूढ आहे आणि गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून काही वेळा वापरला जातो, यात कोणतेही नाविन्य नाही. अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
           काही राज्यांत कोविडचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकांना अनावश्यक गर्दी करण्यापासून परावृत्त करत आहे. महामारीच्या काळात प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. रेल्वे स्थानकांवर केलेली प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीतील वाढ हा केवळ सार्वजनिक हितासाठी केलेला प्रयोग आहे.
           स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचे नियमन आणि नियंत्रण ही विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची जबाबदारी असते. 2015 सालापासून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना जत्रा, मेळावे अशा विशिष्ट वेळी आवश्यकतेनुसार गर्दचे नियमन करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढविण्याचे अधिकार दिले आहेत. क्षेत्र व्यवस्थापनाच्या आवश्यकतेनुसार तिकिटांचे दर बदलण्याचे अधिकार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहेत असे रेल्वे तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने