बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई एनसीबी टीमनं मुंबई सेशन्स कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. तीस हजार पानांचं हे आरोपपत्र असल्याची माहिती समोर येत आहे, ज्यात १२ हजार पानांची हार्ड कॉफी आणि सीडीमधील पुरावे यांचा समावेश आहे.आरोपपत्रामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचे देखील नावं आहे.(NCB files chargesheet against Rhea Chakraborty, others)
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)च्या पथकाने मुंबईपाठोपाठ पुण्यातील हडपसर व खडकवासला परिसरात छापे टाकले होते. आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्जसंदर्भात अनेक गोष्टी समोर आल्यानंतर एनसीबीनं या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली. तब्बल आठ महिन्यापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.आता यात अनेक पुराव्यांच्या आधारे एनसीबीनं आरोपपत्र दाखल केलं आहे.
या आरोपपत्रात ३३ जणांची नावे आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण ३३ आरोपी असल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे. यामध्ये सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचा जबाब आहे, परंतु आरोपी म्हणून नाव नाही. मात्र धर्मा प्रोडक्शन्सचा माजी कर्मचारी क्षितिज प्रसाद, अर्जुन रामपालचा मेव्हणा अजीसीलाओस दिमिटरीटास याचेही नाव आहे अशी माहिती एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.
यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) जीने या प्रकरणात एक महिना जेलची हवा खाल्ली आहे. तसेच तिचा भाऊ शौविक यांची नावं देखील आहेत.आता पुन्हा एकदा रियाच्या अडचणी वाढवण्याच्या शक्यता आहेत. |
टिप्पणी पोस्ट करा