महाराष्ट्र विधानपरिषदेचं पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यांत होणार आहे. यापूर्वीचे अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडले होते. आता या अधिवेशन पूर्वी प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे व विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल आठवण करून दिली आहे.
विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असून, हे पद रिक्त आहे याची आठवण करून देण्यासाठी याआधीही राज्यपाल कोश्यारी यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकाराला पत्र पाठवले होते. पण, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. परंतु पावसाळी अधिवेशन आता येत्या सोमवारी सुरू होत आहे. त्याआधी राज्यपाल यांनी महाविकास आघाडी सरकारला परत एकदा या बाबत स्मरण करून दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्यपाल यांची भेट घेतली होती. यावेळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा तसंच विधानसभा अध्यक्षपद निवडणूक याबद्दल निवेदन दिले होते. आता याच संदर्भात राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला पत्र पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
|
टिप्पणी पोस्ट करा