'उद्धव ठाकरे व पंतप्रधान मोदी यांची दिल्ली येथे झालेली भेट याचा संदर्भ पकडून आज सामनाच्या अग्रलेखात भाजप नेत्यांनवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे आमच्या मध्यस्थीशिवाय मोदींना भेटतातच कसे? असं काहींना वाटलं असावं. पण मोदींनी ठाकरे यांना भेटण्यासाठी इतका वैयक्तिक वेळ का दिला, हा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला तर त्यावर उत्तर आणि औषध दोन्ही मिळेल. पवारही अधूनमधून मोदी यांना भेटत असतात आणि बोलत असतात. पंतप्रधानांशी संवाद ठेवण्यासाठी मधल्या अडत्यांची गरज नाही,' असं अग्रलेखातुन सुनावलं आहे.
|
तसेच 'महाराष्ट्रानं उगाच दिल्लीशी भांडण करण्याचीही गरज नाही. महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावं लागतं हा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात नेहरूंशी भांडण करूनच मुंबई महाराष्ट्रास मिळाली. महाराष्ट्राचं भांडण हे विचारांचं, तत्त्वांचं व राष्ट्रासाठी असतं. शिवसेना त्याच महाराष्ट्र धर्माचं पालन करत आहे,' असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. |
टिप्पणी पोस्ट करा