मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची सुरवात करून संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पहिले मूक आंदोलन कोल्हापूरमध्ये झाले. त्यानंतर नाशिकमध्ये झाले. मात्र, नाशिकमधूनच हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली. त्यांना या विषयावर राज्य सरकारने प्रशासकीय कामे करण्यासाठी २१ दिवसांचा वेळ मागितला होता, त्यासाठी आम्ही पुढील महिनाभरासाठी मूक आंदोलन स्थगित करीत असल्याचे संभाजीराजे यांनी जाहीर केले होते.
|
या दौऱ्याला २ जुलैला सकाळी ९ वाजता पुण्यातून सुरुवात होणार आहे. पुणे, अहमदनगर, आष्टी, जामखेड, पाटोदा या मार्गाने सायंकाळी सहा वाजता बीड, असा दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यावेळी पुणे, अहमदनगर व बीड या तिन्ही जिल्ह्यांत निवडक ठिकाणी थांबून समाज बांधवांशी संवाद साधण्यात येणार आहे. |
टिप्पणी पोस्ट करा