जमीन घोटाळा ( Land Scam) प्रकरणात एकनाथ खडसे (eknath khadse ) यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. एकनाथ खडसे यांची तब्बल 9 तास चौकशी झाली. ही चौकशी झाल्यावर एकनाथ खडसे यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया देत माहिती दिली, एकनाथ खडसे यांनी ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. सर्व कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले आहेत आणि उर्वरित कागदपत्रे 10 दिवसांत सबमिट करू. एकनाथ खडसे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलेले नाहीये मात्र, गरज पडल्यास एकनाथ खडसे पुन्हा चौकशीसाठी हजर होतील.
पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.यात ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांची ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले होते.
|
टिप्पणी पोस्ट करा