भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा (Assembly) भरवली.

           महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) त्यातील कामकाजापेक्षा सरकारच्या कारवाई मुळे जास्त गाजत आहे. काल पहिल्या दिवशी भाजपाचे (bjp ) १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित केल्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. आज दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली असता भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा (Assembly) भरवली.
           भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच प्रती सभा भरवली. यात कालीदास कोळमकर यांना या विधानसभेचं अध्यक्ष करण्यात आले होते. या सभेत भाजपचे आमदार एकेएक करून महाविकास आघाडी सरकारविरोधात मत मांडत होते. तर दुसरीकडे विधानसभेचं कामकाज सुरू होते.
           दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करावे, मात्र माईकाचा वापर करणे योग्य नाही, असा आक्षेप राष्ट्रावादीचे नेते जयंत पाटील यांनी घेतला. त्यानंतर पुन्हा भास्कर जाधव यांनी तातडीने भाजपची विधानसभा बंद करण्याचे आदेश सुरक्षाअधिकाऱ्यांना दिले. आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी भाजपच्या प्रतिविधानसभेत जाऊन माईक बंद पाडला तसेच सभा घेण्यास मनाई केली. या कारवाईमुळे फडणवीस कमालीचे संतापले. व सभा आटोपती घेत विधानभवनाच्या आवारातील पत्रकारांच्या दालनामध्ये ठिय्या मांडला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने