राज्यात लहान मुलांसाठी लशींच्या क्लिनिकल ट्रायलचा तिसरा टप्पा सुरु.

           कोरोना परिस्थितीत लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सध्या कोणत्याही लशीला लहान मुलांसाठी परवानगी मिळालेली नाही, परंतु भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू झाली आहे. देशभरातील एकूण चार ठिकाणी हे क्लिनिकल ट्रायल होत असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर शहराही समावेश आहे. आज नागपूर शहरात लहान मुलांवर लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात होणार आहे.
          आज नागपूरमध्ये 2 ते 6 वयोगटातील मुलांचं क्लिनिकल ट्रायल होणार असून, नागपूरच्या मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये हे ट्रायल आहे. या आधी 6 ते 12 आणि 12 ते 18 या वयोगटातील मुलांचे क्लिनिकल ट्रायल झाले आहे. गुरुवारी या क्लिनिकल ट्रायलसाठी लागणाऱ्या मुलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. आज जे स्क्रिनिंग टेस्ट पास होईल ते क्लिनिकल ट्रायल साठी पात्र असणार आहे.

           एकूण तीन टप्प्यात हे ट्रायल होत आहे. पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणी, दुसऱ्या टप्प्यात 7 ते 11 वयोगटातील मुलांवर चाचणी आणि तिसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वयोगटातील मुलांवर चाचणी होत आहे. आता याचा तिसरा टप्पा सुरु आहे. या क्लिनिकल ट्रायलमध्ये मुलांची रक्ताची तपासणी होते त्यानंतर त्यांना लस दिली जाते. या लशी मुळे लहान मुलांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होण्यास मदत होईल व त्यांना कोरोनाचा धोका कमी राहील

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने