खा. संजय राऊत हे दररोज भाजपवर काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना लगावला. ते चंद्रपुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. फडणवीस कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त त्यांचे मूळ गाव मूल येथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, या आरोपात किती तथ्य आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या ईडीसंदर्भातील प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, 'हा केवळ आरोप आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही'. फडणवीस यांनी यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. राज्य सरकाने इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम ओबीसी आयोगाला दिले आहे आणि राज्य सरकारच्या या निर्णयाचे आपण स्वागत करत असल्याचे ते म्हणाले.
|
टिप्पणी पोस्ट करा