देवेंद्र फडणवीस म्हणाले , पवार साहेबांच म्हणंन योग्य आहे, पण...

           "पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण मला वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करुन कामात लक्ष द्यायला हवं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांचं मी स्वागत करतो. ती त्यांची जबाबदारी आहे. माझ्यासारखे नेते गेल्यास तिथं शासकीय यंत्रणेवर दबाव येतो. त्याचं लक्ष बचावकार्यातून विचलित होतं, यामुळे इतर नेत्यांनीही दौरे करायला नको", असं वक्तव्य मा.शरद पवारांनी यांनी नुकतच मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं होतं.
           या बद्दल मा. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्यं केले असुन ते म्हणाले "मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही आवाहन केलंय, त्याचा अर्थ आपण एवढाच समजून घ्यायला पाहिजे की, दौरे करताना जे दौरे करणारे आहेत, त्यांनी इतकं लक्षात घ्यायला हवं की, त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये" तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले " मी विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच, कारण सरकारने जीआरच काढला आहे. आम्ही दौऱ्यावर गेल्याने शासकीय यंत्रणा जागी होते. यंत्रणा कामाला लागते. दौऱ्यावर गेल्याने लोकांचा आक्रोश समजून घेता येतो, अन तो सरकारपर्यंत पोहचवायला मदत होते. त्यामुळे आपण पवार साहेबांच्या विधानाचा इतकाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन चालंलय ते आपल्या दौऱ्याने थांबू नये. पवार साहेबांच म्हणंन योग्य आहे. बाकी विरोधी पक्षनेता म्हणून जो दौरा करण्याची आवश्यकता आहे, ते मी करणारचं", असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.(Devendra Fadnavis reaction on the Sharad Pawar appeal)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने