आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शाहूपूरी(Shahupuri) मधील पूरग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी जात असतान त्याच ठिकाणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) देखील पहाणी करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आले व त्यांची भेट झाली या भेटीत फक्तं पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितले.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांत काहीतरी चर्चा झाल्याचं दृश्यांत दिसत आहे. मात्र आता या दोन्ही नेत्यांत झालेल्या संवादावरुन चर्चांना उधाण आले आहे. आणि नेहमी प्रमाणे यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोल्हापूर येथील विविध परिसरातील परिस्थितीची पाहणी करत आहेत.
|
टिप्पणी पोस्ट करा