विठ्ठलच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गाडी चालवत गेले यावरून केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे ( narayan rane ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ( uddhav thackeray ) गंभीर टीका केली."राज्याला ड्रायव्हर नकोय. जनतेचं हित जपणारा चांगला मुख्यमंत्री राज्याला हवा आहे. गाडी चालवणारे हजारो ड्रायव्हर महाराष्ट्र शासनाकडे आहेत. त्यात काय कौतुक गाडी चालवण्याचं? मग मंत्रालयात जायचं गाडी चालवत. मंत्रिमंडळ बैठकीला जायचं. पण गाडी चालवत ते मंत्रालयात आणि मंत्रिमंडळ बैठकीलाही जात नाहीत. यात काय भूषण आहे? काय कर्तृत्व आहे. जनतेचा जीव धोक्यात असताना त्यांना वाचवायचं दिलं सोडून आणि ज्यांच्या घरातील माणसं गेली त्यांचं सांत्वन करायचं दिलं सोडून हे गाडी चालवत निघाले" असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे. या वेळी त्यांनी माध्यमांना देखील फटकारले
राज्य सरकारला कुठलंही गांभीर्य नसल्याचा आरोप राणेंनी केला आहे. नागरिकांना तातडीने हेलिकॉप्टर आणि बोटींनी बाहेर काढून त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जायला हवी, असं राणे म्हणाले. मदत आणि बचावकार्यासाठी केंद्र सरकारची टीम पाठवण्यात येईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात माझं बोलणं झालं आहे. तसंच नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशीही आपण बोललो आहोत, असं राणेंनी सांगितलं.
राज्य सरकारला कुठलंही गांभीर्य नाही. पाऊस सुरू झाला आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तयारी करायला हवी आहे. आषाढी एकादशीला पंढपूरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत गेले. पण त्यांना माणुसकी तरी आहे का? चेंबूर आणि भांडुपमध्ये अतिवृष्टीने घरं कोसळल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचं साधं सांत्वन करायला ते गेले नाहीत. भेटही दिली नाही, अशी टीका राणेंनी केली.
|
टिप्पणी पोस्ट करा