केंद्रीय मंत्रिमंडळ समित्यांची फेररचना.

           केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ शक्तिशाली असलेल्या मंत्रिमंडळ समित्यांचीही फेररचना करण्यात आली असून, सुरक्षा विषयक आणि नियुक्त्यांविषयक मंत्रिमंडळ समितीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सुरक्षा समितीवर कायम आहेत. दोन सदस्यांच्या नियुक्तीविषयक समितीत फक्त पंतप्रधान आणि शहा आहेत. राजकीय घडामोडीविषयक मंत्रिमंडळ समितीवर इराणी, यादव आणि सोनोवाल यांना स्थान मिळाले आहे. पंतप्रधान समितीचे अध्यक्ष आहेत. राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, नरेंद्रसिंह तोमर, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी, गिरीराजसिंह, मनसुख मांडवीय, इराणी आणि यादव यांचा समावेश आहे.
           गुंतवणूक आणि वाढ समितीवर पंतप्रधानांसह राजनाथसिंह, अमित शहा, गडकरी, सीतारामन, गोयल, नारायण राणे, जोतिरादित्य शिंदे आणि अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती झाली आहे. रोजगार आणि कौशल्यविकास समितीवर हरदीपसिंग पुरी आणि यादव यांचा समावेश आहे. या समितीवर नितीन गडकरी, आरसीपी सिंह आणि जी. किशन रेड्डी हे विशेष निमंत्रित सदस्य आहेत.
           केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, वीरेंद्रकुमार, किरेन रिजिजू आणि अनुराग ठाकूर यांची संसदीय कामकाज समितीवर नियुक्ती झाली आहे. अर्जुनराम मेघवाल व व्ही. मुरलीधरन हे या समितीवर विशेष निमंत्रित आहेत. आर्थिक घडामोडींवरील समितीत पंतप्रधानांसह राजनाथसिंह, शहा, गडकरी, सीतारामन, तोमर, जयशंकर, गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने