ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी ( Girish Chaudhary) यांना अटक केली आहे. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात (bhosari land scam) मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता त्यानां अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर आज सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.
कालच दोन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेले पावसाळी अधिवेशन संपले. यात गैरवर्तन केल्यामुळे भाजपचे 12 आमदार निलंबित झाले आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव वाढला आहे. यातच अधिवेशन संपत नाही तेच एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्याची बातमी समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात आता नवीन वादाचा अंक पाहण्यास मिळणार आहे.
|
टिप्पणी पोस्ट करा