विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये राडा.

           आज पासून सुरु झालेल्या दोन दिवशीय पावसाळी अधिवेशनात सभागृहात ओबीसी (obc) आरक्षणाच्या मुद्यावरून मोठा राडा पाहण्यास मिळाला. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ घातला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनात भाजप (bjp) आणि महाविकास (mva) आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.
           ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आमदार ठराव मांडत होते, पण ठराव मांडू न दिल्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडत असताना, अध्यक्षपदी बसलेले भास्कर जाधव ऐकत नसल्याने विरोधीपक्ष नेत्यांनी हेडफोन सभागृहात खाली फेकून दिला. तसेच भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि माईक खेचण्याचा प्रयत्न केला.
           त्यानंतर सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर अध्यक्षपदी बसलेले भास्कर जाधव दालनकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. यावेळी धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने