राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आता दिल्ली वारी.

           ईडीने (ED ) दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आता दिल्लीकडे धाव घेतली.ते दिल्लीतील वकिलांचा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी रवाना झाले असून काही राजकीय नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीने (ED) ने सुरु केलेल्या 100 कोटी वसुली प्रकरनाच्या चौकशी नंतर अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बरीच पळापळ सुरू आहे.
           काही दिवसांपुर्वी अनिल देशमुख यांना परत चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी कोरोनाचा काळ आणि वय जास्त असल्याचे कारण देऊन चौकशीला हजर राहण्यापासून मुदत मागितली होती. शुक्रवारीच त्यांच्या मुलालाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यामुळे या प्रकरणाबाबत आता कायदेविषयक सल्ला घ्यायला देशमुख दिल्लीला रवाना झाले आहे. तसेच अनिल देशमुख आता सुप्रीम कोर्टात जाणार का याकडे लक्ष लागले आहे.
           अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना ईडीने अटक केली होती, आता त्यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे(Sanjeev Palande) या दोन्ही आरोपींच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ केली आहे. दोघांनाही 6 जुलैपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. या दोन्ही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी ईडीनं काही मोठे खुलासे केले. सुरुवातीला ईडीनं न्यायालयाकडे दोघांचीही सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र आता आरोपींच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
           खुलासे करताना संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे मिडीलमॅन असल्याचं ईडीनं म्हटलं आहे. तसेच ते चौकशीला सहकार्य करत नसून वाझेला ओळखत नसल्याच आरोपी म्हणतात. आम्ही काही इलेक्ट्रॉनिक पुरावे त्यांच्यासमोर ठेवले. तरी आरोपी वाझेला ओळखत नाही असे सांगतात, असं हि ईडीनं म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने