ईडी (ED) च्या रडार वर असलेले माजी मंत्री अनिल देशमुख(anil deshmukh) यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे( kundan shinde) यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या दोघांच्या ईडी कोठडीत स्पेशल पीएमएलए कोर्टानं आणखी चौदा दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळं या दोघांना आता २० जुलैपर्यंत ईडी कोठडीत असतील.
सचिन वाझे प्रकरणा नंतर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणांच्या चौकशी वेळी अनिल देशमुख यांनी देखील पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने देशमुख यांच्याघरावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
काही दिवसा पूर्वी प्रकरणाचा खुलासा करताना ईडी ने ठपका ठेवला होता कि, मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून अनिल देशमुख यांना चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आणि ती त्यांच्या विविध संस्था व बनावट कंपन्यांमध्ये वळवण्यात आली. या संशयातुन देशमुख यांच्यासह पलांडे व शिंदे यांच्या निवासस्थानी छापे घातल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पलांडे व शिंदे यांना २६ जून रोजी अटक केली होती. दोघांची ईडी कोठडी संपत असल्याने त्यांना आज न्या. एस. एम. भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.
|
टिप्पणी पोस्ट करा