एअर मार्शल विवेक राम चौधरी यांनी 1 जुलै 2021 रोजी भारतीय हवाईदलाच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. भारतीय वायूसेनेच्या लढावू विमानांच्या तुकडीत 29 डिसेंबर 1982 रोजी एअर मार्शल चौधरी दाखल झाले होते. त्यांना 3800 तासांचा विविध प्रकारची लढावू विमाने तसेच प्रशिक्षणासाठीच्या विमानांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, याशिवाय मेघदूत आणि सफेद सागर सारख्या मोहिमेत ते सहभागी होते. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी तसेच वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.
|
त्यांचे पूर्वसुरी एअर मार्शल एच एस अरोरा PVSM AVSM हे आपल्या 39 वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीनंतर 30 जून 2021 रोजी निवृत्त झाले. आपल्या हवाई कर्मचारी प्रमुखपदाच्या कारकीर्दीत त्यांनी लडाखमधील विकासाच्या वातावरणाला साथ देत अनेक प्रकारच्या सोयीं करण्यासाठी तात्काळ आणि उपयुक्त मदतीचा हात दिला होता.त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हवाई दलाने माणूसकीच्या दृष्टीकोनातून विविध आपत्ती व्यवस्थापनादरम्यान सुटका आणि बचावकार्यात भाग घेतला, तसेच भारतात किंवा विदेशात सुरू असलेल्या कोविड संबंधित कार्यातही महत्त्वाचा सहभाग घेतला. |
टिप्पणी पोस्ट करा