भाजपचे खासदार नारायण राणे नवी दिल्लीला रवाना, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांसोबत दिल्लीत बैठक.

           शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपत स्थिरावलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे आज नवी दिल्लीला रवाना झाले आहेत त्यांची भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा पावसाळी आधिवेशनापूर्वी विस्तार होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातुन नारायण राणे यांना संधी मिळणार अशी चर्चा आहे.
           एकेकाळी कट्टर शिवसैनिक तसेच युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री पदावर राहिलेले नारायण राणे शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कालच त्यांनी पत्रकार परिषद मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा न करता पळ काढत असल्याची टीका केली होती. सोबतच आघाडीतले अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचंही देखील त्यांनी म्हटलं होतं.
           भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांनी सातत्याने ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे. पण राज्याच्या राजकारणात त्यांना थेट मोठा प्रभाव पाडता आलेला नाही. आता येणाऱ्या काळात भाजपने त्यांच्या साठी काय योजना आखली आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने