कोकण दौऱ्यावर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांच्या अनु उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं होतं. त्यांच्या दौऱ्यात एकही सरकारी अधिकारी उपस्थित नसल्याने नारायण राणे यांना संताप व्यक्त केला होता. यामुळे त्यानीं सुरवातीला फोनवरुन आणि नंतर समोरासमोर अधिकाऱ्याला याप्रकरणी जाब विचारला होता. याप्रकरणी आता त्यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले कि, “दौरे फिरण्यासाठी केलेले नाहीत. त्यांनीही करु नयेत. आम्ही पूरस्थिती पाहण्यासाठी गेलो होतो. लोकांचं नुकसान झालं आहे. त्याची माहिती अधिकाऱ्यांना विचारणं, दाखवणं आमचं काम आहे. कारण शेवटी अंमलबजावणी करण्याचं काम अधिकारी करतात. त्यामुळे जिथे लोकप्रतिनिधी जातात तिथे अधिकाऱ्यांनी आलंच पाहिजे असा नियम आहे. म्हणून अधिकाऱ्याला तिथे बोलावलं होतं, पत्र पाठवून सांगितलं होतं. अधिकारी उपस्थित राहिले नाहीत म्हणून नाराजी जाहीर केली,” असं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं आहे.
|
टिप्पणी पोस्ट करा