मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाने काही दिवसांपूर्वी एका बंगल्यात छापा टाकून सुमारे दोन वर्षांपासून सुरू असलेला पॉर्न फिल्मचा गोरखधंदा फेब्रुवारीत उघडकीस आणला. याप्रकरणात सहभागी असलेल्या अभिनेत्री गहना वसिष्ठसह बॉलिवूड क्षेत्राशी संबंधित अभिनेता, फॅशन डिझायनर आणि कॅमेरामन यांना अटक केली. बॉलिवूडमध्ये नशीब अजमावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणींना मोठ्या बजेटचे चित्रपट किंवा वेब सिरीजमध्ये भूमिका देतो सांगून त्यांच्याकडून करारावर स्वाक्षरी करून घेतली जाई. हा करार मोडल्यास कारवाई केली जाईल, अशी धमकी देऊन तरुणींना भाड्याने घेतलेल्या बंगल्यात नेऊन त्यांच्या अश्लील चित्रफीत तयार केल्या जात. यामध्ये कुंद्राच्या कंपनीचा व्यवस्थापक उमेश कामतला अटक केल्यानंतर हे अश्लील चित्रपट आणि वेब सिरीजचे चित्रीकरण तसेच अर्थपुरवठा कुंद्राकडून होत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार कुंद्रा आणि यासाठी तांत्रिक जबाबदारी सांभाळणारा रायन थॉर्प याला सोमवारी अटक करण्यात आली.
|
टिप्पणी पोस्ट करा