विजय मल्ल्या ( vijay mallya ) याला लंडनच्या हायकोर्टाने दिवाळखोर ठरवलं.

           मद्य सम्राट विजय मल्ल्या ( vijay mallya ) याला लंडनच्या हायकोर्टाने दिवाळखोर ठरवलं आहे. भारतीय बँकांची कोट्यवधींची फसवणूक करून तो सध्या फरारी आहे. आता लंडनच्या हायकोर्टाच्या निर्णयाचा फायदा भारतीय बँकांना होणार आहे. विजय मल्ल्याची मालमत्ता बँकांना आता जप्त करता येणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात काही भारतीय बँकांनी ब्रिटनच्या कोर्टात एक याचिका दाखल केली होती. विजय मल्ल्या याच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करण्यात यावं, अशी मागणी बँकांच्या संघटनेने कोर्टात याचिकेतून केली होती. या प्रकरणी कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
           किंगफिशर एअरलाइन्स डबघाईला गेल्याने विजय मल्ल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसऱ्या बँकांकडून ९९९० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण या कर्जाची परतफेड मल्ल्या करू शकला नाही. यानंतर एसबीआयच्या नेतृत्वात १३ बँकांच्या संघटनेने कर्ज वसुलीसाठी करत मल्ल्याच्या हस्तांतराची मागणी केली होती.
           मनी लाँड्रींगविरोधी कायद्यानुसार किंगफिशर एअरलाइन्स जप्त केलेल्या शेअर्सच्या विक्रीतून एसबीआयच्या नेतृत्वातील कर्जदात्यांनी ७९२.११ कोटी रुपये जप्त केले होते. ईडीकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. या प्रकरणी जवळपास ५८ टक्के रक्कम बँका आणि सरकारला परत मिळाली आहे, असं ईडीने म्हटलं होतं.
           विजय मल्ल्याकडून लवकरच लंडन हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपील केले जाईल, असं बोललं जातंय. पण यानिर्णयामुळे बँकांना विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करून कर्ज वसुलीसाठी ताकद मिळेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने