भारताच्या महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून फक्त दोन पावले दूर...

भारताच्या पुरुष हॉकी संघा पाठोपाठ भारताच्या महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता भारताच्या महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून फक्त दोन पावले दूर आहे. भारताच्या महिला हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत एकदाही प्रवेश केलेला नव्हता.
          भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला हॉकीमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना चांगलाच रंगला. दोन्ही संघांनी सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले. भारताने यावेळी उत्तम बचाव केल्याचेही पाहायला मिळाले. कारण ऑस्ट्रेलियाला यावेळी गोल करण्याच्या काही संधी आल्या होत्या, पण भारताच्या उत्तम बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. या सामन्यात पहिला गोल केला तो भारतीय संघाने. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला भारताच्या गुरजित कौरने गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.
           सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली होती. त्यामुळे यापुढच्या ३० मिनिटांच्या खेळावर विजय अवलंबून होता. तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने गोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण यावेळी भारताचा बचाव उत्तम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तिसऱ्या सत्रानंतरही भारताने आपली १-० अशी आघाडी कायम ठेवली होती. आणि भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करत इतिहास घडवला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने