लष्कराच्या दक्षिण विभाग प्रमुखांची शिवनेरी ब्रिगेडला भेट.

लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस नैन यांनी 9 ऑगस्ट 2021 रोजी शिवनेरी ब्रिगेडला भेट दिली. तेथील परदेशी प्रशिक्षण केंद्रातील सुविधांची त्यांनी पाहणी केली. इतर देशांच्या लष्कराबरोबर होणा-या आगामी लष्करी सरावाबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी सैनिकांसोबत संवाद साधला आणि लढाईसाठी सदैव सज्ज राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.
           नुकत्याच पार पाडलेल्या ऑपरेशन वर्षा 21 या मोहिमेसाठी घेतलेल्या प्रयत्नांमुळे 2300 लोकांची पूरग्रस्त भागातून सुटका करून त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्याबद्दल त्यांनी ब्रिगेडचे कौतुक केले. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगाचा प्रभावी सामना करण्यासाठी, कार्य सज्जता, तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिस्थितीचे समग्र आकलन होण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. लढ्यासाठी क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक प्रशिक्षण आवश्यक असण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सर्व पदांवरील सैनिकांनी कायम सज्ज राहण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने