सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले भारताच्या महिला हॉकी संघाचा अर्जंटिना कडुन २-१ असा पराभव (India vs Argentina)

भारताच्या पुरुष हॉकी संघा पाठोपाठ भारताच्या महिला हॉकी संघाचा आज उपांत्य फेरीत अर्जंटिना कडुन २-१ असा पराभव झाला. याच बरोबर सुवर्ण पदकाच्या अपेक्षांचं ओझं असतानाच हिला हॉकी संघाचा स्वप्नभंग झाला. यापूर्वी भारताच्या महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. याचबरोबर महिला हॉकी संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा भारतीयांस होती. परंतु आज संघाचा अर्जंटिना कडुन २-१ असा पराभव झाला.
           भारत आणि अर्जंटिना यांच्यातील महिला हॉकीमधील उपांत्य फेरीचा सामना चांगलाच रंगला. भारताने सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोल करून आघाडी घेतली परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात अर्जंटिना संघाने दोन गोल करून सामना खिशात घातला. अर्जंटिना संघाने यावेळी उत्तम बचाव केल्याचेही पाहायला मिळाले.
           आज भारताच्या महिला हॉकी संघाला पराभव पचवावा लागला असला तरी, असं असलं तरीही महिला हॉकी संघाकडे अजुन कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. त्यामुळं भारताचा महिला हॉकी संघ देशासाठी तो कांस्य पदकाची कमाई करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने