Tokyo Olympics : भारताला हॉकीमध्ये ब्रॉन्झ मेडल.

भारतीय हॉकी टीमनं आज टोकयो ऑलिम्पिकमध्ये झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला व ब्रॉन्झ मेडल मिळवले. याआधी भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यानंतर आता बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतानं ऑलिम्पिक मध्ये हॉकी या खेळात मेडल मिळवले.
           आज झालेल्या या मॅचमध्ये जर्मनीनं आक्रमक सुरुवात केली. पहिल्याच क्वार्टरमध्ये जर्मनीनं भारतावर 1-0 नं आघाडी मिळवली. भारतीय टीमनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये जोरदार खेळ केला. जर्मनीनं देखील यात दोन गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. भारतीय टीमनं 2 गोलच्या पिछाडीनंतरही जिद्द सोडली नाही. हार्दिक सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी 2-3 नं कमी केली. त्यानंतर हरमनप्रीत सिंहनं गोल करत सामना 3-3 ने बरोबरीत आणला.
           तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने जोरदार सुरुवात केली. भारताकडून 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मॅचमध्ये पहिल्यांदाच टीमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 5 मिनिटांनीच सिमरनजीत सिंहनं गोल करत 5-3 अशी आघाडी घेतली.
           चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं चौथा गेला. मात्र भारतानं चांगला बचाव करून अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवली व ऑलिम्पिक मेडलवर शिक्कामोर्तब केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने