ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics women's hockey) चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला आज पराभवाला सामोरे जावे लागले.परंतु महिला हॉकी संघानी भारतीयांची मने जिंकली. याआधी भारतीय हॉकी संघाने 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. तेव्हा महिला संघाने चौथा क्रमांक पटकावला होता. कालच पुरुष संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले होते. परंतु आज महिला हॉकी संघाचा ब्रिटन कडुन 4-3 असा पराभव झाला.
ब्राँझ पदकासाठी भारत विरूद्ध ब्रिटन यांच्यातील सामना चांगला उत्कंठावर्धक चालला. टीम इंडियाने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला एकही गोल करता आला नाही. मात्र दुसरा क्वार्टर चांगलाच फलदायी ठरला. दुस-या क्वार्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. ते दोन्ही पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये परिवर्तीत करण्यात भारताला यश मिळालं. पहिल्या क्वार्टरमध्ये पिछाडीवर असलेल्या भारताने या दोन गोलमुळे २-२ अशी बरोबरी मिळवली. त्यानंतर अवघ्या दीड मिनिटात भारताच्या वंदना कटारियाने धडाकेबाज तिसरा गोल केला. त्यामुळे दुसरं सत्र संपताना भारत पिछाडीवरून भक्कम आघाडीवर पोहोचला होता. मात्र, ब्रिटन संघाने आक्रमक खेळ करत ही आघाडी मोडीत काढली व पदक जिंकले.
|
टिप्पणी पोस्ट करा