पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम गति शक्ती - राष्ट्रीय महायोजनेचा प्रारंभ केला. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील नवीन प्रदर्शन संकुलाचे उद्घाटनही त्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, हरदीपसिंग पुरी, सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विनी वैष्णव, आर के सिंह, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, राज्य मंत्री , प्रख्यात उद्योगपती यावेळी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रातील आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, ट्रॅक्टर्स आणि फार्म इक्विपमेंट्सच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक मलिका श्रीनिवासन, टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष टीव्ही नरेंद्रन आणि रिविगोचे सह-संस्थापक दीपक गर्ग यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी आज अष्टमीचा शुभ दिवस, शक्तीची उपासना करण्याचा दिवस असल्याचे सांगितले आणि या शुभ प्रसंगी, देशाच्या प्रगतीची गती देखील नवीन शक्ती प्राप्त करत आहे असे ते म्हणाले. आत्मनिर्भर भारत या संकल्पामुळे पुढील 25 वर्षांसाठी भारताचा पाया आज रचला जात आहे. पीएम गति शक्ती राष्ट्रीय महा योजना (मास्टर प्लॅन ) भारताचा आत्मविश्वास आत्मनिर्भरतेच्या संकल्प सिद्धीकडे घेऊन जाईल असे ते म्हणाले. “हा मास्टर प्लान 21 व्या शतकातील भारताला गती शक्ती देईल,” असे पंतप्रधान म्हणाले.
भारतातील जनता, भारतीय उद्योग, भारतीय व्यवसाय, भारतीय उत्पादक, भारतीय शेतकरी गतिशक्तीच्या या महाअभियानाच्या केंद्रस्थानी आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला . भारताच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना 21 व्या शतकातील भारत घडवण्यासाठी ते नवी ऊर्जा देईल आणि त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करेल.
पंतप्रधान म्हणाले की, वर्षानुवर्षे ‘काम प्रगतीपथावर आहे ’ ही संज्ञा विश्वासाच्या अभावाचे प्रतीक बनली होती. ते म्हणाले की प्रगतीसाठी वेग, उत्सुकता आणि सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते. आज 21 व्या शतकातील भारत जुनी व्यवस्था आणि पद्धती मागे टाकत आहे, असे ते म्हणाले.
|
टिप्पणी पोस्ट करा