पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20 ऑक्टोबर, 2021 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 10 च्या सुमाराला कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. त्यानंतर, सकाळी साडेअकराच्या सुमाराला, ते महापरिनिर्वाण मंदिरात अभिधम्म दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर, पंतप्रधान दुपारी 1:15 च्या सुमाराला, कुशीनगरमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील.
कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, श्रीलंकेच्या कोलंबो येथून उड्डाण करणाऱ्या विमानानाच्या आगमनाने होणार आहे. श्रीलंकेहून येणाऱ्या या विमानात शंभरहून अधिक बौद्ध भिक्कूंच्या शिष्टमंडळाचा समावेश आहे. यात पवित्र बुद्ध अवशेष घेऊन येणाऱ्या 12 सदस्यीय शिष्टमंडळाचाही समावेश आहे. या शिष्टमंडळात श्रीलंकेतील बौद्ध धर्माच्या चारही अनुनायक (उप प्रमुख) आणि निकतांचे (अधिकारी) यांचा समावेश आहे, जसे की अस्गिरिया, अमरापुरा, रमण्य, मालवट्टा. तसेच कॅबिनेट मंत्री नमल राजापक्षे यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंका सरकारचे पाच मंत्रीही शिष्टमंडळात आहेत.
कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ अंदाजे 260 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारले आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय यात्रेकरूंना भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाण स्थळाला भेट देण्यास आणि जगभरातील बौद्ध तीर्थस्थळांना जोडण्याचा हा प्रयत्न आहे. विमानतळाची सेवा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जवळपासच्या जिल्ह्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
पंतप्रधान महापरिनिर्वाण मंदिराला भेट देतील, भगवान बुद्धांच्या मूर्तीला अर्चना आणि चिवर अर्पण करतील तसेच बोधी वृक्षाचे रोपही ते लावणार आहेत. अभिधम्म दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील. हा दिवस बौद्ध भिक्खूंसाठी तीन महिन्यांनंतर परतीच्या पावसाळी कालाचे -वर्षावास किंवा वासाच्या समाप्तीचे प्रतीक आहे, त्या दरम्यान ते विहार आणि मठात एकाच ठिकाणी थांबतात आणि प्रार्थना करतात. या कार्यक्रमात श्रीलंका, थायलंड, म्यानमार, दक्षिण कोरिया, नेपाळ, भूतान आणि कंबोडिया तसेच विविध देशांचे राजदूत उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान अजिंठा फ्रेस्को, बौद्ध सूत्र सुलेखन-कॅलिग्राफी आणि वडनगर आणि गुजरातमधील इतर ठिकाणांहून उत्खनन केलेल्या बौद्ध कलाकृतींच्या चित्रांच्या प्रदर्शनालाही भेट देणार आहेत.
पंतप्रधान बरवा जंगल, कुशीनगर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते 280 कोटी रुपयांहून अधिक खर्चाने बांधण्यात येणाऱ्या राजकिया वैद्यकीय महाविद्यालय, कुशीनगरची पायाभरणी करतील. वैद्यकीय महाविद्यालयात 500 खाटांचे रुग्णालय असेल आणि शैक्षणिक सत्र 2022-2023 मध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमातील 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. पंतप्रधान 180 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 12 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करतील.
|
टिप्पणी पोस्ट करा