राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-एनएचआयने 19 ऑक्टोबर 2021 रोजी नागपूर येथील पारडी उड्डाणपुलाचा एक भाग कोसळण्यामागील कारणांची चौकशी करण्यासाठी एक तज्ज्ञ-समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एक उच्चस्तरीय तांत्रिक तज्ञ समिती या घटनेची चौकशी करेल आणि समितीने अहवाल सादर केल्यानंतर आवश्यक ती पावले उचलली जातील, असे प्राधिकरणातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणातर्फे पारडी फ्लायओव्हरचे काम मेसर्स गॅनन डंकरले अँड कंपनी लिमिटेड आणि मेसर्स एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड संयुक्तरित्या करत आहे. पुर्व नागपूरच्या या निर्माणाधीन पारडी उड्डाणपूलाच्या कळमना ते एचबी टाऊन यामार्गावरील एक भाग-सेगमेंट 19 ऑक्टोबरच्या रात्री 9 च्या सुमारास पियर पी 7 वरून सरकला आणि जमिनीवर पडला. पडलेल्या सेगमेंटचे दुसरे टोक अजूनही पियर पी 8 वर आहे. तथापि या घटनेचे कारण कळाले नसून प्रथमदर्शनी सेगमेंटच्या खाली असलेले बियरिंग्ज खराब झाल्याने ही घटना घडल्याचा अंदाज आहे, मात्र, तज्ज्ञ तांत्रिक समितीच्या सविस्तर तपासणीनंतर नेमके कारण कळणार नाही. सध्या या पियरच्या ठिकाणी कोणतेही काम केले जात नव्हते.
या पुलाचा पी 7-पी 8 मधील सेगमेंट 20 जानेवारी -2018 रोजी आणला असून 13 एप्रिल 2018 रोजी बसविण्यात आला आहे. हा सेंगमेंट 55 एम.एम, कॉक्रींट ग्रेडचा होता आणि जानेवारी, 2018 पासून आजपर्यंत कोणत्याही बिघाडीचे संकेत मिळाले नाही. उभारणीच्या वेळी सर्व चाचण्या प्राधिकरण अभियंतातर्फे घेतल्या असून सध्या त्या ठिकाणी कोणतेही काम प्रगतीपथावर नव्हते. या घटनेत प्रवाशांना किंवा कामगारांना कोणतीही इजा अथवा हानी झाली नाही.
|
टिप्पणी पोस्ट करा