स्पर्धा खेळाडूंचे मनोबल वाढवतात : अनुराग ठाकूर

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी 'दिल्ली हॉकी वीकेंड लीग 2021-22' चे आज नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम इथे उदघाटन केले.
           अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष आणि महिला संघांच्या यशाने भारतात हॉकीला खेळ म्हणून एक नवसंजीवनी मिळाली आहे. या कार्यक्रमात बोलताना ठाकूर म्हणाले की, भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि मी या उपक्रमासाठी दिल्ली हॉकीचे अभिनंदन करतो . यामुळे तळागाळाच्या स्तरावर अधिक प्रतिभावान खेळाडू निर्माण होण्यास मदत होईल. जागतिक उत्कृष्टतेच्या दिशेने तळागाळातल्या प्रतिभेला वाव देण्याचे आमचे ध्येय आहे. प्रशिक्षण आणि स्पर्धा यांना सारखेच महत्व असते कारण ते खेळाडूंचे मनोबल वाढवतात. हॉकीला प्रोत्साहन मिळावे आणि तरुण प्रतिभेला त्यांचे कौशल्य आजमावून पाहण्याची संधी मिळावी, असे आम्हाला वाटते असे क्रीडामंत्री म्हणाले.
           दिल्ली हॉकी फेडरेशनच्या सहकार्याने भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) द्वारा आयोजित हॉकी लीगमध्ये एकूण 36 संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत आणि नंतरच्या टप्प्यात आणखी संघ देखील सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा आजपासून सुरू होत आहे आणि दर शनिवारी रविवारी 4 सामने खेळले जातील. लीगचा पहिला सामना दिल्ली विद्यापीठाच्या श्यामलाल महाविद्यालय आणि फेथ क्लब (एक स्वतंत्र हॉकी क्लब) यांच्यात खेळण्यात आला.उदघाटन समारंभाला माजी भारतीय हॉकीपटू पद्मश्री जाफर इक्बाल, हॉकी विश्वचषक (1975) सुवर्णपदक विजेता ब्रिगेडियर एचजेएस चिमनी आणि माजी भारतीय हॉकी गोलकीपर आणि अर्जुन पुरस्कार विजेते हेलन मेरी इनोसंट विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने