ब्युरो टीम : झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस- २' या मालिकेत पोलिस इन्स्पेक्टर मार्तंड जामकर हे पात्र सध्या चांगलंच गाजत आहे. पहिल्या भागात किरण गायकवाड यांची डॉ. अजितकुमार देव उर्फ देव माणूसची भूमिका गाजल्यानंतर आता नगर जिल्ह्याचे भूषण, प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी इन्स्पेक्टर मार्तंड जामकरच्या भूमिकेतून ही मालिका गाजविण्यास सुरवात केली आहे.
शिंदे यांच्या आजवरच्या अनेक भूमिकामध्ये उजवी ठरणारी भूमिका 'देवमाणूस-२' मधून दिसून येत आहे. मार्तंड जामकर हे पात्र रसिकांना खूपच भावत आहे. यामालिकेत आजवर फक्त अजितकुमार देव हे पात्र उजवे ठरत होते. मात्र, शिंदे यांनी आपल्या इन्ट्रीने रंग भरला आहे. अजितची क्रूरता आणि त्याला शह देणारी पोलिस नीती, शिंदे यांनी अफलातूनपणे साकारली आहे. अजितकुमार देव मालिकेत यापुढे काय करणार? अशी उत्सुकता असायची. मात्र, आता मार्तंड जामकर काय करणार? याची उत्सुकता असते. सामान्य प्रेक्षकच नव्हे तर अनेक पोलिस अधिकारीही आता ही मालिका पाहू लागले आहेत.
चिमनाबाईला न्याय काय मिळंना...., ''कंगणी कंगणी, व्हय व्हय कंगणी..., 'दिल चीज क्या हे आप मेरी... या शिंदे यांच्या मालिकेतील गाणीरूपी संवादाने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या हटके तपास करण्याच्या पद्धतीची पोलिस अधिकाऱ्यांनाही भुरळ पडली नाही, तरच नवल. आतापर्यंत चित्रपटांतील पोलिस अधिकाऱ्यांची पात्र गाजली. आता मराठी टीव्ही मालिकेतील पात्र शिंदे यांच्यामुळे गाजत अल्याचे दिसून येते.
टिप्पणी पोस्ट करा