किसमें कितना है दम ! आज राज्यसभा निवडणूक


ब्युरो टीम : आज, शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, संध्याकाळी हाती येणाऱ्या निकालांबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता असून त्यानंतरच कोणाला किती जागा मिळाल्या, हे स्पष्ट होणार आहे. 
धोरणांच्या अंमलबजावणीत कळीच्या ठरणाऱ्या राज्यसभेतील रिक्त जागांबाबत आज निर्णय होणार आहे. उत्तर प्रदेश ११, महाराष्ट्र ६, तमिळनाडू ६, बिहार ५, आंध्र प्रदेश ४, राजस्थान ४, कर्नाटक ४, ओडिशा ३, मध्य प्रदेश ३, तेलंगणा २, छत्तीसगड २, झारखंड २, पंजाब २, हरयाणा २, उत्तराखंडमध्ये एका जागेबाबत आज, शुक्रवारी चित्र स्पष्ट होईल.
महाराष्ट्राचा विचार केल्यास येथे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यामध्ये लढत आहे. माजी मंत्री अनिल देशमुख आणि अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांना मतदान करू देण्यास न्यायालयाने मनाई केल्याने महाविकास आघाडीची दोन मते कमी झाली आहेत. त्यामुळे  उमेदवार निवडून येण्याचा कोटाही किंचित कमी झाला आहे. ही कमी झालेली मते आघाडीचीच असल्याने आमच्यासाठी हे अधिक फायद्याचे असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे,  भाजपने पहिल्या दोन उमेदवारांना ४२ चा कोटा दिल्यास त्यांच्याकडे ३३ मते शिल्लक राहतात. तर, महाविकास आघाडीने आपल्या तीन उमेदवारांना ४२ चा कोटा दिल्यास त्यांची ४० मते शिल्लक राहतात. त्यामुळे सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आकडेवारीत पुढे असल्याने त्याला दुसऱ्या पसंतीच्या कमी मतांची गरज राहील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने