नगर : 'मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये माझं एकही वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात नाही, मातोश्रीच्या विरोधात नाही. शिवसेनेच्या विरोधात नाही. शिवसैनिकांचे विरोधात नाही, किंवा शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात नाही. एवढच काय, कुठल्याही शिवसेनेच्या तालुक्यात अध्यक्षाच्या विरोधातही नाही. माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले, त्याचं मला काही वाईट वाटलं नाही. उलट शिवसेनेसोबत फक्त पारनेर तालुक्यातच नाही, तर नगर जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक व्यक्ती हा शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहील, हे मी आज एक खासदार म्हणून ठामपणे सांगतो. माझ्यावर फडणीस यांनी कारवाई केली, तरी चालेल. नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली, तरी चालेल. पण मी या शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही, हे आज ठामपणे सांगत आहे. कारण मी नगर जिल्ह्याचे राजकारण ओळखतो,' असे खळबळजनक वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे.
या वक्तव्याने नगर जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद भाजपच्या खासदारांनी मान्य केल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरलेली आहे. दरम्यान, हे वक्तव्य आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं भाजपला दगाफटका करणार तर नाहीत ना, अशी कुजबूज सुरू झाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून खासदार विखे यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच मेळाव्यांचे आयोजन सुद्धा त्यांनी केले होते. काल, पारनेर येथे मात्र एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मात्र विखे यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
खासदार विखे म्हणाले, 'आज डॉ. सुजय नगर जिल्ह्याचा खासदार आहे, त्यामध्ये 50 टक्के वाटा हा नगरच्या शिवसेनेचा आहे, हे मी ठामपणे सांगतो.मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये माझं एकही वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात नाही, मातोश्रीच्या विरोधात नाही. शिवसेनेच्या विरोधात नाही. शिवसैनिकांचे विरोधात नाही, किंवा शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात नाही. एवढच काय, कुठल्याही शिवसेनेच्या तालुक्यात अध्यक्षाच्या विरोधातही नाही. आजही माझं मत हेच आहे, राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचे काम महाराष्ट्रात करत आहे. राष्ट्रवादी शिवसेना संपवण्यासाठी सत्तेत आले आहे . याचा परिणाम कालच्या निवडणुकीत दिसलाच आहे. माननीय पवार साहेबांनी राज्यसभा निवडणुकीनंतर जे वक्तव्य केलं, त्यावरून असे दिसते की, 'पवार साहेबांना निकाल पूर्वीच माहिती होता, व त्यांच्यामुळेच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात मान खाली घालावी लागली, असे सांगतानच ते पुढे म्हणाले, 'माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले, त्याचं मला काही वाईट वाटलं नाही. उलट शिवसेनेसोबत फक्त पारनेर तालुक्यातच नाही, तर नगर जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक व्यक्ती हा शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहील, हे मी आज एक खासदार म्हणून ठामपणे सांगतो. माझ्यावर फडणीस यांनी कारवाई केली, तरी चालेल. नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली, तरी चालेल. पण मी या शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही, हे आज ठामपणे सांगत आहे. कारण मी नगर जिल्ह्याचे राजकारण ओळखतो.'
टिप्पणी पोस्ट करा